‘सब चीजे सार्वजनिक नही होती’, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं. राजधानी दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब
भाजपाच्या ‘निकटवर्तीय’ बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर २६ मार्चच्या रात्री ९:३० वाजता ही भेट झाल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं बोललं जात होतं. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.