राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, या घोषणा होत असताना अजित पवार मात्र टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली फिरवताना दिसले. शिवाय त्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधण्यासही नकार दिला. त्यामुळे शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
त्यानंतर अजित पवारांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
हे ही वाचा:
पाठीवरील बॅगच्या सहाय्याने त्याने विकृताला पळवले, मॅक्रॉन खुश झाले
धुळ्यात हिंदूंचा जनसागर लोटला!
पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.