तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

ठाकरे सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीवरील बंदीवरुन सरकारवर सडकून टीका केलीय. सरकारने कितीही निर्बंध लावले तरी आम्ही सण साजरा करणार. काय होईल ते बघू, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सर्व काही सुरु आहे, नारायण राणेंच्याबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

महाराष्ट्र, मुंबईतच निर्बंध का? बाहेरच्या राज्यात का नाही? जन आशिर्वाद यात्रा चालली, तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन का? सणांमधून रोगराई पसरते, यात्रेंमधून, हाणामाऱ्यांमधून नाही का? यांना जेव्हढं हवं आहे, तेव्हढं करायचं आणि लोकांना घाबरवून ठेवायचं हे सरकारचं धोरण आहे. असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

Exit mobile version