राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. या लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन असं नाव दिलं आहे. त्यानुसार उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात पुढील १५ दिवस कलम १४४ लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे.
Maharashtra COVID19 guidelines: All establishments, public places, activities to remain closed. Essential services exempted, their operations to be unrestricted.
Restrictions to be in effect from 8pm, 14th April till 7am, 1st May pic.twitter.com/1jYZvTMhYK
— ANI (@ANI) April 13, 2021
राज्यात १४४ कलम लागू पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील. अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. त्या अत्यावश्यक कामांसाठीच वापरल्या जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या प्रवासासाठी त्या सुरु ठेवण्यात येतील. त्यामध्ये रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील.
बांधकाम, अन्य उद्योगांना सांगतो की, तुमच्या साईट्सवर शक्य असेल तर तिथेच तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय करा, त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. तुमच्या कँम्पसमध्ये सुविधा नसतील तर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
हे ही वाचा:
फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन
मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता
हा तर ठाकरे सरकारच्या अपयशाचा उद्रेक
पुढील १५ दिवस हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध असतील. टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरु राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी आहे. पण त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरु ठेवावी अशा सूचना आहेत. पाणीपुरवठा, शेतीची काम करण्यास मुभाइलेक्ट्रिक, गॅस पुरवठा, एटीएम सुविधा सुरु राहणार आहेत. घरोघरी वर्तमानपत्रांचं वाटप सुरु राहील तसेच, सिनेमागृह, चित्रिकरण, बगीचे, व्यायामशाळा बंद राहतील.