पश्चिम बंगालमध्ये ७९.११% मतदान

पश्चिम बंगालमध्ये ७९.११% मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरुवार, २२ एप्रिल रोजी पार पडले. रात्रीपर्यंत हाती आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार या टप्प्यातही नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात एकूण ७९.११% एकूण मतदान झाल्याचे समजत आहे.

कोरोनाच्या सावटात देशातील पाच विधानसभांच्या निवडणुका आल्या. यापैकी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरवार, २२ एप्रिल रोजी झाले. सकाळपासूनच नागरिकांनी या असून अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. निवडणुकीच्या या सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यातील, ४३ विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले. यापैकी नादिया जिल्ह्यात सर्वाधिक ८२.७०% मतदान झाले तर पूर्व बर्धमान जिल्ह्यात ८२.१३% मतदान झाले. उत्तर दिनाजपूरमध्ये ७७.९९% मतदान झाले तर दक्षिण २४ परगण्यात सगळ्यात कमी म्हणजेच ७६.२३% मतदान झाले.

पण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने प्रचारावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमधील राजकीय पक्षांचे रोड शो तसेच बाईक, कार, सायकल रॅलीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर राजकीय सभांसाठी ५०० माणसांची मर्यादा असणार आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेता २३ एप्रिल रोजी बंगालमधे होणाऱ्या त्यांच्या सभा रद्द केल्या आहेत. गुरुवारच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये ११,९४८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ५६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

Exit mobile version