पश्चिम बंगाल पोलिसांची ममताच्या विरोधात ‘साक्ष’

पश्चिम बंगाल पोलिसांची ममताच्या विरोधात ‘साक्ष’

ममता बॅनर्जींवर झालेला ‘हल्ला’ हा हल्ला नसून केवळ अपघात होता, अशी स्पष्टोक्ती खुद्द बंगाल पोलिसांनीच दिली आहे. काल नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना ममता बॅनर्जींनी शक्ती प्रदर्शनही केले. संपूर्ण कार्यक्रमानंतर जेंव्हा ममता बॅनर्जी त्यांच्या गाडीत बसून जाऊ लागल्या तेंव्हा अचानक त्यांच्या पायाला दुखापत झाली. ममता बॅनर्जींनी असा दावा केला की त्यांना चार-पाच लोकांनी धक्का दिल्यामुळे पायाला इजा झाली. परंतु आता पोलिसांनीच हा केवळ अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पूर्व मेदिनीपूरच्या पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील नेते डेरिक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती की, ममता बॅनर्जींना झालेली दुखापत हा घातपात असून यामागे मोठे षडयंत्र आहे. पश्चिम बंगालचे डीजीपी, जावेद शमीम यांची कालच्या घटनेच्या काही तासांपूर्वीच निवडणूक आयोगाने बदली केली. निवडणूक आयोगाने नेमलेल्या विवेक दुबे यांच्या नेमणुकीवर ममता बॅनर्जींनीही टीका केली होती. निवडणूक आयोग अनेक निवडणुकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अशा पद्धतीने बदल्या करत असतो, यात विशेष असे काहीच नव्हते.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

यापूर्वीच स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी देखील, ममतांची गाडी लोखंडी खांबाला आपटून हा अपघात झालेला असल्याचे सांगितले. शिवाय त्यांना कोणीही धक्का दिला नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाने हा ममता बॅनर्जींचा राजकीय स्टंट असल्याचे सांगितले होते. शिवाय, या प्रकरणाची उच्च स्तरीय चैकशी केली जावी अशी मागणीही केली होती. पोलिसांनी ममतांवर कोणत्याही प्रकारचा ‘हल्ला’ झाल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसाने देखील ममतांची गाडी रस्त्यावरच्या एका लोखंडी खांबाला आदळून गाडीचा दरवाजा ममतांच्या पायावर आपटल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version