निवडणूकीनंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने सारा देश हादरून गेला होता. निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये हैदोस घातला होता. भारतीय जनता पक्षाच्या मतदार, समर्थक, कार्यकर्त्यांपासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांवर हल्ले करण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हे हल्ले थांबले असले तरीही नागरिकांच्या मनातली दहशत अजून कमी झालेली नाही. गुरुवारी याची प्रचिती पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना आली. नागरिकांच्या मनात फक्त तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाही तर पश्चिम बंगाल पोलिसांचीही भीती आहे असे ट्विट राज्यपाल धनकड यांनी केले आहे.
२ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर राज्यात हिंसेचा तांडव सुरु झाला. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर हल्ले केले गेले. यात लूटमार, मारहाण, जाळपोळ, तोडफोड, महिलांवर अतिप्रसंग अशा हिंसेच्या अनेक घटना समोर आल्या. तृणमूलच्या या राजकीय हिंसेचा बळी ठरलेल्या नागरिकांना गुरुवार, १३ मे रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी भेट दिली.
राज्यपालांच्या या दौऱ्यात हिंसेचा बळी ठरलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी त्यांचे मन राज्यपालांपाशी मोकळे केले. राज्यपालांनी ट्विटरच्या माध्यमातून या सर्व परिस्थितीबद्दल भाष्य केले आहे. राज्यपाल धनकड यांच्या एका ट्विटमध्ये ते म्हणतात. “आज कूच बिहार भागातील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेचा फटका बसलेल्या परिसराला भेट दिली. इथली निर्दय परिस्थिती पाहून फार त्रास झाला. इथल्या लोकांच्या दुःखी कथा ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू थांबू शकले नाहीत. निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या हिंसाचाराची तीव्रता कल्पनेपलीकडची आहे. लोकांना त्यांच्या मतदानाची किंमत स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली आहे.”
At Coochbehar. Visited several affected areas. Distressed at grim scenario. After listening to tales of sorrow no tears left in my eyes. Never imagined severity of post poll retributive violence @MamataOfficial was much beyond.
One is made to pay with life and rights for voting!
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) May 13, 2021
हे ही वाचा:
भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले
कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज
६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे
मुंबई असो किंवा तेल अवीव…दहशतवाद हा दहशतवाद आहे
तर पुढे एका ट्विटमध्ये राज्यपाल म्हणतात, “दिवसभर दुःखाच्या, शोकाच्या आणि भयाच्या कथांचा साक्षीदार झालो. निवडणूक निकालानंतर उसळलेल्या राजकीय हिंसाचाराचा बळी ठरलेले लोक एकामागून एक हिंसाचाराच्या भयानक कथा सांगत होते. पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या यांच्यासमोर हे नागरिक हतबल झाले आहेत. या सर्व गोष्टी मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कानावर घालणार आहे.”
All day witnessed such tales of sorrow, grief and horror as victim after victim narrated horrendous post poll retributive violence incidents @MamataOfficial. Helpless victims in crossfire of police @WBPolice and ruling party workers. Will endeavor to deliberate with CM. pic.twitter.com/mwZqVgPdgy
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) May 13, 2021