पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

भारतात एकीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे राजकीय वातावरण रोजच तापलेले दिसत आहेत. पण अशातच आता पश्चिम बंगालच्या राजकारणाने वेगळाच ट्विस्ट घेतला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप ढांकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन बरखास्त केले आहे. पण तसे असले तरी त्यांनी राज्याचे सरकार अथवा विधानसभा बरखास्त केलेली नाही.

पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णया मागचे नेमके कारण पुढे आले नसले तरी देखील याला पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल या संघर्षाची किनार असल्याचे म्हटले जात आहे.

जगदीप ढांकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हे घोषित केले आहे की संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारांच्या अंतर्गत कलम १७४ च्या उपकलम २ (अ) अन्वय पश्चिम बंगालचे अधिवेशन शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२ पासून बरखास्त करत आहे.

हे ही वाचा:

‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’ 

ठाकरे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे अडचणीत

आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप ढांकर यांच्या या निर्णयानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सत्ताधारी तृणमूल पक्ष नेमकी काय भूमिका घेतो? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी तृणमुल काँग्रेस पक्षाचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी राज्यसभेत आपल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल जगदीप ढांकर यांना हटविण्यात यावे या संदर्भात थेट राष्ट्रपतींकडे निवेदन दिले आहे. राज्यसभा सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात राज्यपाल ढांकर हे सरकारच्या दैनंदिन कारभारात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Exit mobile version