पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालांनंतर झालेला प्रचंड हिंसाचार हा राजकीय नाही तर जिहादी मानसिकता दाखविणारा आहे, असा सूर आता उमटू लागला आहे. बंगालमध्ये याआधीही दंगली, जाळपोळ, लुटालूट होत असे पण यावेळी निवडणुकीनंतर झालेले आक्रमण हे प्रामुख्याने हिंदू समाजावर झालेले आक्रमण आहे. भाजपाशी संबंधित विविध व्यक्तींवर झालेले हे सामुदायिक आक्रमण आहे. हे आक्रमण एवढे तीव्र होते की, ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केले, त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यासाठी जेसीबी, बुलडोझरही वापरण्यात आले. ही जिहादी मानसिकता नाही तर काय आहे?
हे ही वाचा:
लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत
यश आलं की राज्याचं,अपयश आलं की केंद्राचं
हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री
महिलांवर बलात्कार, विनयभंगाच्याही घटनांमध्ये या काळात मोठी वाढ झालेली दिसली. महिलांवर अत्याचाराच्या ६६२१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. २०४२ गावांत अशा लुटालूट, दंगलीच्या घटना प्रामुख्याने घडल्या त्यातील ३०० गावांवर तर या जिहादी आक्रमणाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४१०५ कार्यकर्ते या दंगलखोरांचे लक्ष्य बनले. निवडणूक निकालानंतर झालेल्या या हिंसाचारात ज्यांच्या घरांवर हल्ले झाले, घरे उद्ध्वस्त करण्यात आली, अशा तब्बल ६४०० लोकांना आधार देण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांचा सफाया झाला आहे. त्यामुळे हा तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा असा निवडणुकीतील संघर्ष आहे असे वाटत असले तरी हे एक मोठे युद्ध आहे. जे दीर्घकाळ चालणार आहे. ही जिहादी मानसिकता वाढण्यामागील कारण म्हणजे भाजपाने बंगालमध्ये मिळविलेले यश. याआधी सर्वाच्या सर्व २९४ जागा भाजपाने कधी लढविल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणुकीत लावलेला हा जोर प्रकर्षाने जाणवणारा होता. त्याला मोडून काढण्यासाठीच हा पूर्वनियोजित हिंसाचार रचण्यात आला. म्हणूनच या हिंसाचारात ज्या हिंदूंवर आक्रमण झाले त्याविषयी सत्यपरिस्थिती समोर यायला हवी. हल्ल्यांचे व्हीडिओ, त्यासंदर्भातील फोटो, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची करुण कहाणी समाजासमोर यायला हवी. जेवढे बळी गेले त्याचे वास्तव चित्र लोकांसमोर यायला हवे. कारण हा आजवरचा मोठा दंगा आहे. देशाच्या अखंडतेला नख लावण्याचाच हा प्रयत्न आहे. न्यायालयांनीही याची विशेष दखल घेत सुओ मोटो खटला दाखल करून वास्तव जाणून घेतले पाहिजे.