पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्य पोलिस काहीही करत नसून केंद्रीय दलांनाही राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल भाजप युनिटचे अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी केला आहे. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सुकांत मजुमदार म्हणाले की, जोपर्यंत ममता बॅनर्जी इच्छित नाहीत तोपर्यंत राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी होणार नाहीत.
नेते सुकांत मजुमदार यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी आपली ताकद दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वक्फ मालमात्तेवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. या गोष्टींकडे लक्ष जाऊ नये यासाठी हे सुरू आहे.
भाजपा राज्याचे ध्रुवीकरण करू इच्छित आहे, या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना मजुमदार म्हणाले की, हा आरोप चुकीचा आहे. जर बंगालमध्ये ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपला नाही तर तृणमूल काँग्रेसला होईल. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे १०० टक्के ध्रुवीकरण झाले आहे, तर हिंदूंचे ध्रुवीकरण झालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की ही दंगल मुस्लिम बहुल भागात झाली. हिंदू भागात दंगली झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमदार आहेत. पुढे सुकांता मजुमदार यांनी पुढे आरोप केला की केंद्रीय दलांनाही राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. त्यांना दंगलग्रस्त भागात जाण्यापासून रोखले जात आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचा राज्य सरकारचा दावा त्यांनी खोटा असल्याचे म्हटले.
हे ही वाचा :
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?
मुर्शीदाबादेत दंगलखोरांकडून लाखोंची लूट, कायमचा बीएसएफ कॅम्प हवा!
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
केकवर गुन्ह्याची कलमे लिहून गुंडाचा वाढदिवस
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत आणि अतिरिक्त पाच कंपन्या देखील पाठवण्यात आल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.