पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या राज ठाकरेंचे स्वागत!

भाजपा नेते, आमदार अतुल भातखळकर यांचे उद्गार

पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या राज ठाकरेंचे स्वागत!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या भाजपमध्ये सामील होण्याच्या वाटेवर आहेत.दोन्ही पक्षात तशा चर्चा देखील पार पडत आहेत.आज (१९ मार्च) मंगळवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज ठाकरे यांनी भेट देखील घेतली.वाढत्या गाठीभेटींमुळे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीमध्ये सामील होण्याची चिन्हे समोर दिसू लागली आहेत.दरम्यान, मनसे जर महायुतीमध्ये सामील झाल्यास त्याचा येणाऱ्या काळात कितपत फायदा होईल यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे.

राज ठाकरे आपल्यासोबत आल्यावर मुंबईत भाजपला किती फायदा होईल, असा प्रश्न विचारला असता.आमदार भातखळकर म्हणाले की, फायदा हा केवळ मुंबईत नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे.महाराष्ट्रामध्ये ४५ हुन अधीक जागा महायुतीच्या येतील, संपूर्ण ४८ जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या सर्व प्रयत्नांमध्ये राज ठाकरे हे महायुतीयामध्ये सामील झाले तर आम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला त्याचा फायदा होईल.

हा नेमका फायदा कशाप्रकारे होईल, शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे मतांचे देखील विभाजन झाले, त्यामुळे मनसेला सामील करून घेत आहात का?, या प्रश्नावर आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यामध्ये महायुतीचे सरकार चालू आहे आणि आपण पाहत आहोत की, सगळे राजकीय पक्ष, अनेक नेते, लोक हे पूर्णपणे पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विचारांमध्ये सम्मिलित होत आहेत.त्याच प्रमाणे राज ठाकरे देखील सम्मिलित होत आहेत आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे.त्यामुळे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीमध्ये आल्यास निश्चित त्यांचे स्वागत आहे आणि त्याचा फायदा हा आगामी राजकारणामध्ये होईल,असे आमदार भातखळकर म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, मतांचं विभाज करण्यासाठी शहांच्या मनसुब्यांना महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही.यावर आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, संजय राऊत यांनी अगोदर महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं बघावं, वंचित बरोबर काही जमतंय का ते बघा आणि राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत.त्यामुळे त्यांच्या विधानांना कोणीही महत्व देत नाही.लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ४५ हुन जास्त जागा या महायुतीच्याच असतील, असे भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा:

गुजरात विद्यापीठात हाणामारीचे कारण फक्त नमाज नाही…

शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार

मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे सहा बछड्यांना दिला जन्म

निवडणूक रोख्यांच्या माहितीचा गैरवापर करण्याविरोधात यंत्रणा नाही!

राहुल गांधी यांच्या शक्ती टिप्पणीवर आमदार अतुल भातखळकर म्हणाले, हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू समाजाच्या विचारांमध्ये शक्तीला अतोनात महत्व आहे आणि शक्ती म्हटले की,आपल्या पुढे माँ दुर्गेचे रूप डोळ्यासमोर येते, माँ सरस्वती समोर येते आणि या शक्तींच्या विरोधात, हिंदू शक्तींच्या विरोधात मी लढणार आहे, असे हिंदू द्वेषी, हिंदू द्रोही हे राहुल गांधी यांनी केलं, हेच ते राहुल गांधी ज्यांनी अमेरिकेन कॉन्सलिटच्या लोकांनां सांगितलं की, हिंदू दहशतवाद हे या देशासमोरचा सर्वात मोठा धोका आहे आणि पुन्हा एकदा हिंदू विरोधी चेहरा राहुल गांधी आणि काँग्रेसचा शिवाजी तीर्थावर झालेल्या त्यांच्या भाषणात स्पष्ट झालेला आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ महाराष्ट्रामधील नाहीतर देशातील जनता राहुल गांधी, काँग्रेस आणि सनातन धर्माला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कडाडून धडा शिकवेल.असे भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान, मुंबईमध्ये कोअर कमिटीची बैठक पार पडत असून नेमका काय अजेंडा आणि कोणत्या विषयावर चर्चा झाली.यावर आमदार भातखळकर म्हणाले की, निवडणुकीचा काळ सुरु असल्यामुळे पक्षाकडून अनेक उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले असून अन्य मित्रपक्षांच्या उमेदवारांची नावे देखील घोषित होणार आहेत, त्यामुळे या सर्व परिस्थितींचा विचार करण्याकरिता आणि सहाच्या-सहा जागा कशा निवडून येतील या दृष्टीने आमचे प्रयत्न सुमारे दीड वर्षांपासून चालू आहेत त्यातीलच एक भाग म्हणून आज मुंबईतील भाजपची कोअर कमिटीची मिटिंग होती.

Exit mobile version