राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपेल. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

उत्तराखंडमधील अग्नितांडव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर

नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल. हा निर्णय एकमताने झालाय. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केलीय, असं मलिक म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version