कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. केजरीवाल यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजेपासून ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत हा विकेंड कर्फ्यू लागू असणार आहे.
अत्यावश्यक सेवासंबंधी लोकांसाठी कर्फ्यू काळात खास पास दिले जातील. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि ऑडिटोरियम या काळात बंद राहतील. चित्रपटगृह ३० टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यात येतील. लोकांना रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण करता येणार नाही. फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी असेल, अशी माहिती केजरीवाल यांनी दिलीय.
दिल्लीतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यबाल अनिल बैजल यांच्यासोबत सकाळी ११ वाजता बैठक घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी दुपारी १२ वाजता केजरीवाल यांनी आरोग्यमंत्री, दिल्लीचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विकेंड कर्फ्यूचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्य माहितीनुसार दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता नाही. आजही दिल्लीत ५ हजार बेड शिल्लक असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
हे ही वाचा:
मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ
महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील
मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?
संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील
राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत १७ हजार २८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतल कोरोनाच्या संसर्गाची टक्केवारी वाढून १५.९२ टक्क्यांवर पोहोचली आहे. संसर्गाची टक्केवारी वाढण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही शंभरच्या वर गेली आहे. बुधवारी १०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मंगळवारी १३ हजार ४६८ नवे रुग्ण आढळून आले होते. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणात मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.