“तिघे मिळून महाराष्ट्रात विकासाचा नवा अध्याय लिहू”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

“तिघे मिळून महाराष्ट्रात विकासाचा नवा अध्याय लिहू”

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार आणि खासदारांनी शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. तसेच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली आहे.

“जे घडले, ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. याद्वारे महाराष्ट्रात आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असे तिघेही मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ. आम्ही एक अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारे सरकार देऊ,” अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत सध्या ३० ते ४० आमदार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये अदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र, अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितले आहे.

हे ही वाचा:

ट्रिपल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार

शिवसेनेनंतर वर्षभरातचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट!

“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “आता राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत आहे. अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल.”

Exit mobile version