24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणसरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

Google News Follow

Related

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. “सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू.” अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली.

“लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारच्या भ्रष्टाचाराला जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे.” अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

हे ही वाचा:

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेले, म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. १५ वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मिटर कट करुन ५-५ हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखळं जात होतं. पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. लेख उत्तम.राजकीय विषया सोबतच इतर विषयां वरील लेख पोर्टल वर उपलब्ध करून द्यावे ही विनंती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा