आम्ही न्यायासाठी लढत राहू

आम्ही न्यायासाठी लढत राहू

पालघर जिल्ह्यात घडलेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेला एक वर्ष झाले आहे तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यावरूनच ठाकरे सरकारवर निशाण साधत भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली. साधूंना न्याय मिळावा ही मागणी करताना भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक तुषार भोसले यांनी लाक्ष्यणिक उपोषण केले. पालघर जिल्ह्यात जाऊन जिथे ही घटना घडली त्या गडचिंचले गावात जाऊन साधून श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा मानस होता. पण त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

शुक्रवार १६ एप्रिल २०२१ रोजी पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर बसून लाक्ष्यणीक उपोषण केले. पालघर येथे जाऊन त्या साधूंच्या स्मृतीत तिथे दिवा पेटवण्याचाही त्यांचा इरादा होता. पण त्या आधीच पोलिसांनी उपोषणाच्या जागेवरून त्यांना ताब्यात घेतले. पण न्यायासाठी आम्ही लढत राहू असे सांगत आचार्य भोसले यांनी आपले मनसुबे जाहीर केले आहेत.

हे ही वाचा:

भगव्या कफनीने केला त्यांचा घात

पालघर हत्याकांड:- एक वर्षानंतर

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’

रियाज काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काय आहे नेमके प्रकरण?
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात २ साधूंची निर्घृण हत्या झाली आणि त्याने सारा देश हादरून गेला. पालघरमधून दादरा नगर हवेली मार्गे गुजरातकडे हे साधू जायला निघाले होते. महंत कल्पवृक्ष गिरी महाराज, महंत सुशील गिरी महाराज असे हे दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे असे तिघे जण होते. पण वाटेतच गडचिंचले गावात त्यांना ४०० ते ४५० लोकांच्या जमावाने दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोर घडला आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असा आरोप सुरवातीपासूनच होत आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणात योग्य तो न्याय मिळालेला नाही. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरीही या प्रकरणाच्या बाबतीत सरकारच्या भूमिकेबद्दल पहिल्यापासूनच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारमार्फत ही केस म्हणावी तितकी मजबूत करण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version