‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’

राहुल गांधींच्या १०-११ वर्षे जुन्या व्हिडीओवर भाजपची टीका

‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा जुना व्हिडीओ दाखवून भाजपने काँग्रेसवर हल्ला केला आहे. या व्हिडीओत राहुल कथितपणे मुसलमानांना आरक्षण देण्याचे समर्थन करताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडीओत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनाही लक्ष्य करताना राहुल गांधी दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला प्रश्न विचारले आहेत.

पश्चिम बंगालमधील प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘मी सोशल मीडियावर काँग्रेसच्या शहजाद्याचा एक व्हिडीओ पाहिला आहे. ११-१२ वर्षे जुन्या असणाऱ्या या व्हिडीओत काँग्रेसचे हे शहजादे उघडपणे सांगत आहेत की काँग्रेस पक्ष मुसलमानांना आरक्षण देतील. एकीकडे तेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग वारंवार सांगत होते की, देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. तर, दुसरीकडे रिमोट कंट्रोलने सरकार चालवणाऱ्या शहजाद्याचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस मुसलमानांना आरक्षण देईल. हेच काँग्रेसचे सत्य आहे. ज्याला काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने वर्षानुवर्षे देशवासींच्या समोर आणू दिले नाही.’

हे ही वाचा:

पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत

पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?

गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!

‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

या व्हिडीओत काय?

या व्हिडीओत राहुल गांधी भाषण देत आहेत. ‘आरक्षणाचा मुद्दा आणला. मुलायमसिंह यादव तीनवेळा मुख्यमंत्री झाले. ते एकदाही आरक्षणाबाबत बोलले नाहीत. पत्रकारांनी दोन-तीनदा आरक्षणाबाबत विचारले तरीही ते बोलले नाहीत. मनमोहन सिंग म्हणतात की हो, आम्ही मुसलमानांना आरक्षण देऊ. आम्ही त्यांना सहभागी करून घेऊ. तेव्हा मुलायमसिंह म्हणत की मी असतो तर अधिक केले असते. मात्र तुम्ही तीनवेळा सत्तेत होता, तेव्हा तुम्ही का नाही केले?, असा प्रश्न राहुल विचारताना दिसत आहेत.

Exit mobile version