महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी ठाकरे सरकारवर, वनमंत्री संजय राठोड याच्यावर आणि पोलिसांवरही चौफेर हल्ला केला. ज्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून जनतेसमोर आल्या आहेत त्या क्लिप्समधील आवाज हा संजय राठोड याचाच आहे हे त्या सांगत आहेत. सत्तेसाठी सर्व प्रकारच्या तडजोडी हे महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. याशिवाय वानवडी पोलीस ठाण्यातील सिनियर पीआय लगड हे रगेलपणा करत आहेत आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. “पूजा चव्हाणचा फ्लॅट सील केलेला आहे. वरच्या फ्लॅटमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. या फ्लॅटच्या ग्रीलची उंची माझ्या कमरेइतकीच आहे.” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
हे ही वाचा:
पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी दोघांची चौकशीही पोलिसांनी केली नाही, की त्यांना सोडून द्यायचं ठरलं होतं? त्यांच्या घरांना टाळं लागल्याचं मीडियात पाहिलं असंही चित्र वाघ म्हणाल्या. सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू असंही त्या म्हणाल्या. “दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे. पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या अरुण राठोडच्या मोबाईलवर हा फोन आला होता. त्यावेळी दरवाजा तोड सांगणारा आवाज संजय राठोड यांचाच होता हे मी शंभर टक्के खात्रीने सांगते.” असं त्यांनी सांगितले.