21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनिया‘आगामी सरकार बनविण्यासाठी नव्हे; तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले पाहिजे’

‘आगामी सरकार बनविण्यासाठी नव्हे; तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले पाहिजे’

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट विचार

सरकार स्थापन करण्यासाठी सरकार चालवले जाते, हे खरे नाही तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले गेले पाहिजे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत आपल्या स्पष्ट भावना व्यक्त केल्या आहेत.

पी. आर. रमेश यांनी घेतलेल्या मुलाखतीत मोदी यांनी अनेक विषयांना स्पर्श करत आपली स्पष्ट आणि परखड मते व्यक्त केली आहेत.

तुम्ही अनेक निर्णय घेताना धोके पत्करलेत. जमीन हस्तांतरण कायदा, नोटबंदी, कामगार कायदे, शेतकरी कायदे यासंदर्भातील निर्णय घेताना तुम्ही धोका पत्करलात पण त्याच्या परिणामांची पर्वा केली नाहीत, हे कसे शक्य झाले, या प्रश्नावर मोदी म्हणतात, आजपावेतो आपल्याकडे असेच राजकारण होत राहिले आहे की, सरकार स्थापन करण्यासाठी सरकार चालविले गेले आहे. पण माझे विचार वेगळे आहेत. राष्ट्र घडविण्यासाठी सरकार स्थापन व्हायला हवे यावर माझा विश्वास आहे. यासाठी मी नेहमीच गांधींजींचा आदर्श बाळगतो. आपल्या निर्णयांमुळे गरीबांचे नुकसान होईल की फायदा हा विचार मी करतो. जर निर्णय घेताना त्यात वैयक्तिक हिताचा जरासा जरी संशय मनात आला तर मी तो निर्णय घेत नाही. घेतलेला निर्णय हा शुद्ध हेतूने घेतलेला असावा, अचूक असावा असे माझे मत आहे. तसे असेल तरच त्या निर्णयाची अमलबजावणी करण्याकडे माझा कल असतो.

मोदी म्हणतात की, भारतासारख्या विशाल देशात १०० टक्के लोकांना पसंत पडेल असा निर्णय घेता येईल का? जरी अगदी कमी लोकांना निर्णय पसंत पडला नाही तरी ते चुकीचे नसतात. त्यांच्या ठिकाणी ते योग्यही असतील. पण जर तो निर्णय अनेकांच्या हिताचा असेल तर सरकारने त्याची अंमलबजावणी करायलाच हवी.

हे ही वाचा:

‘गांधींचे पुतळे उखडा आणि नथुरामचे बसवा म्हणणारे भुजबळ आज काँग्रेसमध्ये आहेत’…  

शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

मोदी या मुलाखतीत म्हणतात की, आधार कार्ड, जीएसटी, शेतीविषयक कायदे यासंदर्भात राजकारण केले जाते. आधी आपणच यासंदर्भात आश्वासने द्यायची आणि नंतर त्यांनाच विरोध करायचा, असे दुटप्पी धोरण बाळगले जाते. नव्या संसदभवनाची गरज याआधी वर्तविली गेली आहे पण आता तेच नवे संसदभवन उभे राहात आहे तेव्हा विरोधक विरोध करत आहेत. या विरोधकांना या निर्णयात देशाचे हित आहे का हे दिसत नाही. मोदींना यश मिळविण्यापासून रोखता येत नाही, ही त्यांची सल आहे. मोदी यशस्वी होतील की नाही, हा प्रश्न नाही तर देशाला फायदा होईल की नाही, याला महत्त्व आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा