भाजपाला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. “हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं.” महाजन यांच्या या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खडसे विरुद्ध महाजन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
“राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकरचा कोरोना आहे. एका व्यक्तीला ३-३ वेळा त्याची लागण झाली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीन वेळा कोरोनाची लागण होत आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी, असं मी म्हणत नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे.” अशी टिप्पणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांना सर्वात आधी १९ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.