लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा देशभरात प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही लोकसभा निवडणूक २०२४ साठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या सरकारच्या काळात कसा विकास झाला हे सांगताना त्यांनी हे ही सांगितले आहे की, प्रशासनही मजबूत बनले आहे. नुकतेच ते अलीगढमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “कोणी विचार केलेला की, मुलगी आणि व्यापारी रात्री सुरक्षित बाहेर पडू शकतात. आम्ही फक्त रामच आणत नाही, तर मुलगी आणि व्यापारी यांच्या सुरक्षेला जो धोका बनतो, त्याचा राम नाम सत्य सुद्धा करतो,” असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सुरक्षा व्यवस्थेवर भाष्य केले. जर एखादा व्यक्ती समाजाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असेल, तर त्याचे राम नाम सत्य निश्चित आहे. १० वर्षापूर्वी जे स्वप्न होतं, ते आता प्रत्यक्षात आले आहे. तुमच्या एका मतामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलं, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
हे ही वाचा..
भारत मालदीवला पाठवणार आवश्यक वस्तू!
प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला
फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव
“तुम्ही तुमच एक मत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं, तर मोदींच्या गॅरेंटीने तुमचं भविष्य बनेल. सध्या वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, हायवे, रेल्वे, एअरपोर्टचे निर्माण कार्य सुरु आहे. डिफेंस कॉरिडोर, गुंतवणूक, मेडिकल कॉलेज, विश्वविद्यालय, फॅक्टरीच निर्माण कार्य चालू आहे. तुमचे एक मत चुकीच्या लोकांना गेल्यामुळे देश भ्रष्टाचार, अराजकता आणि उपद्रव यामध्ये बुडून राहत होता. तुमचं मत होतं म्हणून त्या पापामध्ये आपण सुद्धा भागीदार असणार,” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.