“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

एका महिन्यापूर्वी प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली होती. याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर पक्षाकडे पैसे नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच देशातील न्यायालय, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही असेही ते म्हणाले.

“सात वर्षांपूर्वी १४ लाखांचा कर भरण्यात काही कसूर झाली, त्याबद्दल २०० कोटी रुपये असलेली बँक खाती गोठविण्यात आली आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार अशाप्रकारे कर भरण्यात उशीर झाला तर जास्तीत जास्त १०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र, तरीही बळजबरीने, गुन्हेगारी पद्धतीने आमच्याविरोधात कारवाई केली जात आहे. भारताचे पंतप्रधान आमचे संविधानातील अधिकार गुन्हेगारी पद्धतीने हिरावून घेत आहेत. माझे भारतीय स्वायत्त संस्थांना आवाहन आहे की, त्यांनी या विषयात काहीतरी करावे.” असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

भारतात लोकशाही आहे, हे सर्वात मोठे असत्य आहे. आता लोकशाही उरली नाही. सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची खाती अवैधरित्या गोठविली जातात. महिना होऊन गेला तरी कुणीही काही बोलत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळातील म्हणजे १९९४ च्या प्रकरणातही आम्हाला आता नोटीस बजावली जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसची चार बँकांमध्ये ११ खाती होती. त्यामध्ये २०० कोटींपेक्षाही अधिकची रक्कम होती. त्या सर्व पैशांना नोटीस बजावून गोठवले गेले. निवडणुकीच्या कामात, प्रचारात सहभागी होण्याऐवजी आम्ही बँकेचे, न्यायालयाचे खेटे मारत आहोत. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टा आहे, असं काँग्रेस पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!

चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला

जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!

“जर एखाद्या कुटुंबाचं खातं गोठवलं गेलं तर त्या कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिल, त्यांना उपाशी मरावं लागेल. हेच काँग्रेस पक्षाबरोबर करण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी खाती गोठवल्यानंतरही या देशातील न्यायालय, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. आम्ही २० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आज आम्ही रेल्वे तिकीट विकत घेऊ शकत नाही, आमच्या नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवू शकत नाही. आम्ही जाहिरात करू शकत नाही. आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Exit mobile version