काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मीडियाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. राज यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचं निमंत्रण दिलं. चहा प्यायला बोलावलं होतं. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो. त्यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावलं म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार सांगणं हा या बैठकीचा विषय होता, असं पाटील यांनी सांगितलं

त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. नाशिकला ते ही जातात मी ही जातो. आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली. राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये ८० टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा असंही त्यांनी सांगितलं. यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी केला.

हे ही वाचा:

न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार का?

लोकल प्रवास नाकारणारे जनविरोधी ठाकरे सरकार

भाजपाच्या रेलभरो आंदोलनाचा मुंबईत एल्गार

सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपोरेटे जैसे थे

कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच. या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही. विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या. त्यावर मी त्यांना सांगितलं इथून ५० पावलांवर पत्नीचं ऑफिस आहे. त्याही येतील, असं सांगतानाच राज ठाकरे माझ्या घरी चहा प्यायला आले तर मला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.

Exit mobile version