भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर मोठे ऋण असल्याचे म्हटले आणि त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. ते प्रेम, तो स्नेह मी विसरू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती कायम श्रद्धा राहील असे म्हटले.
टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का, असा सवाल विचारल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते त्यांचे पुत्र आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण माझे त्यांच्या कुटुंबासोबत चांगले संबंध राहिलेले आहेत. जेव्हा बाळासाहेब आजारी होते तेव्हा मी त्यांच्या घरी फोन केला होता. मी नियमितपणे फोन करून वहिनींना (माँसाहेब) विचारत असे. बाळासाहेबांवर शस्त्रक्रिया करण्याआधीही मला फोन करण्यात आला आणि माझे मत विचारले तेव्हा मी म्हटले की, प्रथम शस्त्रक्रिया करून घ्या. बाकी सोडून द्या. कारण शरीराची काळजी घेतलीच पाहिजे.
हे ही वाचा:
राहुल गांधी रायबरेलीतून लढणार; अमेठीतून केएल शर्मा रिंगणात
फडणवीसांनी उघड केला एंटालिया प्रकरणाचा सूत्रधार?
अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!
त्यामुळे बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा सन्मान करणारच. ते काही माझे शत्रू नाहीत. उद्या समस्या निर्माण झाली त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मी असेन पण परिवार म्हणून. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा आहे, त्यासाठी मी समर्पित आहे. बाळासाहेबांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. मी ते प्रेम कधीही विसरू शकत नाही. ते ऋण आहे.
नरेद्र मोदी म्हणाले की, आज आमच्याकडे जास्त आमदार आहेत तरीही आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. ही बाळासाहेब ठाकरेंना माझ्यावतीने वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही एकमेकांविरोधात मागील निवडणुकीत लढलो आहोत पण मी एकदाही बाळासाहेबांविरोधात शब्दही बोललो नाही. मी सार्वजनिकरित्या हे म्हटले होते की, उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरीही मी बाळासाहेबांबद्दल काहीही बोलणार नाही. कारण मला बाळासाहेबांप्रती श्रद्धा आहे. मी त्यांचा आदर करतो आणि करत राहीन.