26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणवीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली खंत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रातून जो आक्षेपार्ह असा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यासंबंधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ५ जुलै २०२२ या दिवशी दिले. दादरच्या शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन तेथे स्वातंत्र्यवीरांना त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आता हिंदुत्वाच्या विचारांचे लोक सरकारमध्ये आहेत. आता आमचे सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने नेहमीच आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यामुळेच आता सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकविणार आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन मुख्यमंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे सहकारीही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दर्शन घेतल्याने मला पूर्ण समाधान मिळाले आहे. आमचे सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच स्थापन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्या आमदारांची घुसमट होत होती. हिंदुत्व आणि वीर सावरकरांचे विचार बोलताही येत नव्हते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरीताई मराठे, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आता स्थापन झालेले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वात आधी राज्यातील विकासाच्या मुद्द्यांना प्राथमिकता दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारकडून सोडवण्याचे प्रयत्न आधी केले जातील. राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येकाला हे सरकार आपले आहे, असे वाटायला हवं त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा; अजमेर शरीफच्या सलमानला अद्याप अटक नाही

बनावट नोटांचे धागेदोरे मध्यप्रदेशच्या आश्रमाशी जुळले

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

 

शिवसेनेच्या ज्या १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईबाबत पत्रकारांनी विचारले असताना मुख्यमंत्री म्हणाले की, सूडभावनेने काहीही केले जाणार नाही, नियमानुसार ज्या गोष्टी असतील त्या केल्या जातील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा