लोकसभेच्या पराभवाने नाराज नाही, थकले नाही, आपल्याला आपला डाव खेळायचाय!

भाजप महिल्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

लोकसभेच्या पराभवाने नाराज नाही, थकले नाही, आपल्याला आपला डाव खेळायचाय!

बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज (१२ ऑक्टोबर) दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर आले. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील मेळाव्याला उपस्थित होते. पंकजा मुंडेनी सभेला संबोधित करताना जनतेसाठी काम करणार असल्याचे म्हटले. तसेच लोकसभेला पराभव झाल्याने थकले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

पंकजा मुंडे सभेला संबोधित करताना म्हणाल्या, माझा विजय झाल्यानंतर जनतेने मला इज्जत दिली, परंतु लोकसभेला माझा पराभव झाल्यानंतर जनतेने त्यापेक्षाही जास्त मला इज्जत दिली. आता जनेतेला इज्जत देण्यासाठी आम्ही राज्यव्यापी दौरा करणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, आपल्याला आपला डाव खेळायचा आहे.

हे ही वाचा :

लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

हरयाणा भाजपा सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

होमगार्ड्ससाठी आनंदाची बातमी, मानधन केले दुप्पट!

जनतेला प्रश्न विचारात पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, तुम्हाला वाटत का, ताई थकल्या आहेत, पडल्यामुळे नाराज झाल्या आहेत, आमदारकी घेतल्यामुळे शांत झाल्या आहेत. तुम्हाला विश्वास आहे ना, मग घोड मैदान काही लांब नाही.

राज्यातील कानाकोपऱ्यात आपल्या लोकांना, वंचीताना, पिडीताना जर कोणी त्रास दिला असेल, तर त्याचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून देशातील गरीब लोक चांगले दिवस येण्याची वाट बघत आहेत. यासाठी मी राज्यातील कानाकोपऱ्यात येणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होतात. त्या पुढे म्हणाल्या, पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही, अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Exit mobile version