सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू

सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू

राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केंद्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्याच स्वरुपाची आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काहीच संबंध नाही, असं सांगतानाच आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्ही २०२४च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.

रावसाहेब दानवे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. विरोधी पक्षनेत्याने केंद्रातील नेत्यांना भेटणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील नेत्यांच्या भेटी घेण्याशी सरकार पाडण्याचा काहीच संबंध नाही. पक्ष वाढीसाठी या भेटी असतात. सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा दानवे यांनी केला.

राज्यातील आघाडी सरकार जन्माला आल्यापासून अस्थिर आहे. ही अनैसर्गिक युती आहे. विषम युती आहे. जनतेलाही ही युती मान्य नाही. त्यामुळे जनता २०२४च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे. या सरकारमध्येच वाद आहेत. त्यामुळेच ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधीच केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असं विधान केलं नाही. गेल्या सहा महिन्यात तर नाहीच नाही, असा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा:

देवाच्या काठीला आवाज नसतो

अमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी केलेली युती ही नैसर्गिक युती होती. जनतेला मान्य असलेली युती होती. त्यामुळे आता आम्ही शिवसेना आमच्यासोबत येईल की येणार नाही,  या विचारात वेळ घालवणार नाही. आम्ही २०२४च्या तयारीला सुरुवात केली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version