ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडणारे मोहित भारतीय यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे. आमच्यावर असे कितीही हल्ले झाले तरी आमचे तोंड बंद होणार नाही. भ्रष्टाचाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतच राहू असा निर्धार त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला.
मोहित भारतीय यांच्या गाडीवर शुक्रवार, २२ एप्रिलच्या रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्याचा सर्वत्र निवषेध नोंदवला जात आहे. शनिवार, २३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना निषेध व्यक्त केला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
“सध्या राज्यामध्ये सरकारच्या भ्रष्टाचारावर कुठे बोललो तर त्याला आम्ही जीवे मारून टाकू अशी प्रवृत्ती दिसते. पण अशा प्रवृत्तीला आम्ही केरळमध्ये घाबरलो नाही, पश्चिम बंगालमध्येही घाबरलो नाही, तर महाराष्ट्रात घाबरायचा प्रश्नच उद्भवत नाही. हे हल्ले सरकारच्या भरवशावर आणि पोलिसांच्या भरवशावर सुरू आहेत. दोन तीनशे लोकांनी मिळून एखाद्यावर हल्ला करणं पोलिसांच्याच भरवशावर सुरू आहे. या हल्ल्याचा निषेध आहे. पण ठणकावून सांगतो की अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे आमचे तोंड बंद होणार नाही. भ्रष्टाचाऱ्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढत राहू”
हे ही वाचा:
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’
झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
काल ट्विटर वरूनही देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही.