भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना राम मंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाकप्रमाणे आम्ही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, संपूर्ण भारतात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.
हे ही वाचा:
मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार
कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली
राणे बंधूंनी पुन्हा घेतला वरूण सरदेसाईचा समाचार
सिंह यांनी यावेळी म्हटले की, जेव्हा जेव्हा आम्ही राम मंदिराबद्दल बोललो त्यावेळी लोकांनी आमची थट्टा केली, की आमच्याकडे बोलायला दुसरे मुद्दे नाहीत. परंतु आम्ही राम मंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक प्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही जे म्हटले आहे, ते पूर्ण करूच त्यामुळे समान नागरी कायदा देखील लागू करू.
त्यांनी हे देखील सांगितले की समान नागरी कायदा कोणत्याही धर्माच्या विरूद्ध नसेल. तो कायदा हिंदु, मुस्लिम किंवा ख्रिश्चनांच्या विरोधात नसेल. आमचे राजकारण मानव आणि मानवतेवर आधारित आहे.
सिंह यांनी हे देखील सांगितले की, जर पक्षाने त्यांचे वचन पूर्ण केले नाही तर तो विश्वासार्ह्यता गमावतो. रामजन्मभूमी आंदोलनाच्या पूर्ततेमुळे लोकांचा भाजपावरचा विश्वास वाढला. त्यांना विश्वास वाटू लागला की भाजपा सरकार स्थापन करू शकते.