23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामातृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

Google News Follow

Related

भाजपा कार्यकर्त्याच्या मूक पत्नीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या हिंसाचारावरून भाजपा ममता बॅनर्जी यांना सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आता भाजपाचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. ममता बॅनर्जी यांचं सरकार बलात्काराला राजकीय हत्यारासारखं वापरत असल्याचा घणाघात सुवेंदु अधिकारी यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या मूक पत्नीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली होती. पीडित महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी २ आरोपींना अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही आरोपींना कडक शिक्षा होण्याची मागणी केली आहे. अमता विधानसभा मतदारसंघातल्या बागनानमधली आहे.

भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी याबाबत ट्विट करत ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”महिला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात बलात्कार हे राजकीय शस्त्र म्हणून वापरले जात आहे, हे विचित्र आहे. मी भाजपा कार्यकर्ता हरीसाधन पॉल यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यावर टीएमसी कार्यकर्त्यांनी बागानानमध्ये क्रूरपणे बलात्कार केला होता. उत्तम उपचार आणि काळजी घेण्यासाठी तिला चांगल्या रुग्णालयात हलवणे ही पहिली प्राथमिकता होती. पोलीस आणि प्रशासन या अमानुष गुन्ह्यातील गुन्हेगारांना लपवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पीडितेला न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही,” असं ट्विट सुवेंदु अधिकारी यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

पश्चिम बंगालच्या अमता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बागानानमध्ये ही अत्याचाराची घटना घडली. शनिवारी पीडित महिली घरात एकटी होती. तिचे पती काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साडेबारा वाजता तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक प्रमुख कुतुबुद्दीन मलिक आणि टीएमसी युवा अध्यक्ष देवाशीष राणा इतर तीन लोकांसह भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले. यावेळी ५ जणांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पती घरी आल्यानंतर त्याला ही घटना समजली. त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर तीन जण अजूनही फरार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा