राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातील खासदारकी पुन्हा बहाल

लोकसभा सचिवालयाकडून यासंबधीची अधिसूचना जारी

राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातील खासदारकी पुन्हा बहाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून यासंबधीची अधिसूचना सोमवार, ७ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातली खासदारकी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टरस्ट्रोकने ठाकरेंना घरी बसवणारे मास्टर

ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?

चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यात आढळला विषारी कोब्रा!

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या कोलारमध्ये प्रचार सभेत मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे असते? अशी टिप्पणी केली होती. त्यावर भाजपाचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात सत्र न्यायालय आणि नंतर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली होती. शिक्षेमुळे राहुल गांधींची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. मात्र, याविरोधात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

Exit mobile version