महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. नागरीकांना सहाय्य करण्यासाठी सरकारतर्फे वॉर रुम्सची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या वॉर रुमधल्या लोकांनाच फार काही माहिती नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
सरकारने कोरोना रुग्णांच्या सुविधेसाठी मोठा गाजावाजा करत वॉर रूमची स्थापना केली आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे संवाद साधल्यानंतर फार काही हाती लागेलच याचीच शाश्वती देता न येण्यासारखी अवस्था उद्भवली आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हे ही वाचा:
लस उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवावेत
नॅशनल हाऊसिंग बँकेच्या बोर्डावर सतीश मराठेंची नियुक्ती
जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी
कोरोना रुग्णांसाठी गाजावाजा करून चालू केलेल्या वॉर रूम्सकडेच माहितीचा अभाव असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तर युट्युबवरून माहिती घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहे. वॉर रूमची कार्यक्षमता मुख्यमंत्र्यांसारखीच अद्भुत आहे.
असे ट्वीट करून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.
कोरोना रुग्णांसाठी गाजावाजा करून चालू केलेल्या वॉर रूम्सकडेच माहितीचा अभाव असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तर युट्युबवरून माहिती घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहे. वॉर रूमची कार्यक्षमता मुख्यमंत्र्यांसारखीच अद्भुत आहे. pic.twitter.com/8UwJBHXCFm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 16, 2021
महाराष्ट्रातील कोविड-१९ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यात बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषध या सर्वांचा प्रचंड तुटवढा भासत आहे. त्या सर्व आघाड्यांवरील ठाकरे सरकारचे अपयश वेळोवेळी समोर आले आहे. सध्या महाराष्ट्रात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.