पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे. १० एप्रिलला होणाऱ्या या मतदानात ३८२ उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होणार आहे. आज एकूण ४४ जागांसाठी मतदान होईल. त्याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर केंद्रीय पथक आणि पश्चिम बंगाल पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रचाराच्या दरम्यान सातत्याने ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय पोलीसांवर टीका केली होती.

चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या प्रचारतोफा गुरुवारी (८ एप्रिल) थंडावल्या. आज होणाऱ्या मतदानामध्ये उत्तर बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातल्या पाच जागांसाठी, कूचबिहार जिल्ह्यातल्या नऊ जागांसाठी तर दक्षिण बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या दहा जागा, हावडा जिल्ह्यातल्या नऊ जागा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. चौथ्या टप्प्यातल्या मतदारांना खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. आता मतदार आज कोणाला मतं देतात ते २ तारखेला स्पष्ट होईल.

आज होणाऱ्या ४४ जागांमध्ये अनेक हायप्रोफाईल लढती होणार आहेत. यामध्ये सिंगूर विधानसभा लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इथे ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या सिंगूरमधून ममतांचे सहकारी बेचाराम मन्ना लढत आहेत. हावडा जिल्ह्यातल्याच शिबपूर विधानसभा मतदारसंघात माजी क्रिकेटर मनोज तिवारी आपलं नशीब आजमवत आहे. हावडा मध्य मतदारसंघातून मंत्री अरुप राय निवडणूक लढवत आहेत. कूचबिहार जिल्ह्यातल्या  दिनहाटा मतदारसंघातून उदयन गुहा, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या टॉलिगंज मतदारसंघातून मंत्री अरुप विश्वास, बेहला पश्चिम मतदारसंघातून मंत्री पार्थ चॅटर्जी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

देवभूमीत होणार मंदिरमुक्ती

भाजपाकडून टॉलिगंज मतदारसंघातून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चुचुडा मतदारसंघातून खासदार लॉकेट चॅटर्जी, चंडीतला मतदारसंघातून अभिनेता यश दासगुप्ता, जादवपूर मतदारसंघातून रिंकू नस्कर तर डोमजूर मतदार संघात माजी मंत्री आणि टीएमसीचे नेते राजीव बॅनर्जी यांचं भवितव्य कैद होणार आहे.

Exit mobile version