उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील तर दुसरीकडे पंजाबमध्ये सर्व जागांसाठीची मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे तर पंजाबमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांमधील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंजाबमधील सर्वच ११७ जागांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ६२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात २ कोटी १५ लाख ७५ हजार ४३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ कोटी १६ लाख १२ हजार १० पुरुष मतदार आहेत, तर ९९ लाख ६२ हजार ३२४ महिला मतदारांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट
मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या भेटीला
पंजाबमध्ये ११७ जागांसाठी १ हजार ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये २.१४ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सत्ताधारी काँग्रेसवर ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी या निवडणुकीत जोरदार निशाणा साधला होता. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ५८ जागांवर १० फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे.