27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल

Google News Follow

Related

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज, १३ जुलै रोजी मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर आज प्राप्त झाले आहे. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले.

निवडणुकीचे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे. येत्या १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाकरीता भारताची राजधानी दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे.

हे ही वाचा:

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य महाराष्ट्र विधान भवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूम येथे पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा