सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात

सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान

सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह देशभरात दिसून येत असताना निवडणुकीचे पाच टप्पे यशस्वी पार पडले आहेत. तर, शनिवार, २५ मे रोजी या निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, या उमेदवारांचे भवितव्य ११ कोटींहून अधिक मतदारांच्या हातात आहे.

शेवटच्या टप्प्यात अनेक प्रतिष्ठेच्या लढती होणार असून भाजपाच्या नेत्या मनेका गांधी, मनोज तिवारी, जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती, काँग्रेसचा कन्हैया कुमार यांच्यासह अनेक जण निवडणूक रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात हरियाणामध्ये १० जागा, बिहारमध्ये आठ जागा, झारखंडमध्ये चार जागा, ओडिशात सहा जागा, उत्तर प्रदेशमध्ये १४ जागा, पश्चिम बंगालमध्ये आठ तर, दिल्लीत सात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सात लोकसभा जागांवर मतदान सुरू आहे. यानंतर शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार असून निकाल स्पष्ट होणार आहे.

यासोबतच ओडिशा राज्य विधानसभेसाठी ४२ विधानसभा मतदारसंघांवर एकाच वेळी मतदान होत आहे. या टप्प्यात दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांवर मतदान होत आहे भाजपाचे मनोज तिवारी, बन्सुरी स्वराज, काँग्रेसचे कन्हैया कुमार, उदित राज आणि आम आदमी पार्टीचे सोमनाथ भारती हे राजधानीच्या शहरात रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी आहेत.

हे ही वाचा:

‘माझा तुरुंगवास स्वातंत्र्य चळवळीसारखा’

आता व्हीआयपींनाही राम मंदिरात फोन नेण्यास बंदी

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले

हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

हरियाणातील सर्व १० जागांवर सहावाव्या टप्प्यात मतदान होत आहे. रिंगणातील प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मनोहर लाल खट्टर यांचा समावेश आहे. तर, भाजपचे राव इंद्रजीत सिंग आणि नवीन जिंदाल हेसुद्धा निवडणूक मैदानात आहेत.पश्चिम बंगालमध्ये, पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आदिवासी पट्ट्यातील जंगल महाल भागात मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातही मतदान सुरू आहे.

Exit mobile version