राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक ५ एप्रिल २०२६ आणि राज्यसभा खासदार पीयूष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाल ४ जुलै २०२८ असा आहे. तथापि, १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार, २१ ऑगस्ट तर, गुरूवार, २२ ऑगस्टला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २६ ऑगस्ट अशी असून मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हे ही वाचा:
पवार २०१९ ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत?
‘चित्रगंगा’च्या माध्यमातून जगदीश खेबुडकरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्याची संधी
उद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला सुनावले
मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!