गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आज, १ डिसेंबर रोजी १९ जिल्ह्यांमध्ये ८९ जागांसाठी मतदान सुरु आहे. या पहिल्या टप्प्यात जवळपास २ कोटींहून अधिक लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, गुजरातचा मिनी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबूर गावात लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी येथे खास आदिवासी बूथ बनवण्यात आले आहेत. मतदारांमध्ये उत्साह दिसून येतं आहे.
गुजरातमधील १९ जिल्ह्यांतील या जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात २.३९ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यातील एकूण ८९ जागांपैकी भाजपाकडे सर्वाधिक जागा आहेत. तसेच ८९ जागांपैकी दोन जागा रिक्त आहेत. मोरबी, कच्छ, राजकोट, पोरबंदर आणि जुनागड या जागांवर आज विशेष लक्ष असेल.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता.
हे ही वाचा :
प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम
ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित
अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी
दिलासा नाहीच; नवाब मलिक यांचा तुरुंगातच मुक्काम
गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता राखली आहे. या वर्षी जर भाजपाने विजय मिळवला तर तब्बल ३२ वर्ष एका राज्यावर सत्ता केल्याचा विक्रम भाजपाचा होणार आहे. त्यामुळे सातव्यांदा पुन्हा एकदा भाजपा विजय मिळवणार का याकडे लक्ष लागून आहे. आज आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात गुजरातमध्ये मतदान पार पडणार आहे. ८ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.