नरेंद्र मोदींना मत द्या हीच लग्नाची भेट; तेलंगणातील लग्नपत्रिका व्हायरल

पंतप्रधान मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन

नरेंद्र मोदींना मत द्या हीच लग्नाची भेट; तेलंगणातील लग्नपत्रिका व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशभरातचं नव्हे तर जगभरात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. अनेक सर्वेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सिद्ध झाली आहे. अशातचं तेलंगाणामधील एका व्यक्तीने लग्न पत्रिकेतून आमंत्रित करताना अनोखी विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन पत्रिकेतून करण्यात आले आहे.

तेलंगणातील संगारेड्डी येथील एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना अनोखी विनंती केली आहे. निमंत्रण पत्रिकेत या व्यक्तीने लिहिले आहे की, लोकांना नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू घेऊन येऊ नका, तर आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करा, असा संदेश या पत्रिकेतून देण्यात आला आहे.

साई कुमार आणि महिमा राणी यांचे लग्न ४ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान या दोघांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लग्नाच्या कार्डाच्या मुखपृष्ठावर असे लिहिण्यात आले आहे की, “जर तुम्ही नरेंद्र मोदीजींना मत दिले तर हीच या लग्नाची भेट असेल” असा संदेश आहे. सोशल मीडियावर या पत्रिकेचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. संदेश छापणारे साई कुमारचे वडील नानिकांती नरसिम्हालू यांनी अशा आशयाचा संदेश छापून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी

तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपाची ताकद वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वात ‘मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. दक्षिण भारतात ते एकापाठोपाठ एक रोड शो, रॅली, सभा, हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये सभा घेतल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकता यावा, यासाठी दक्षिणेकडील राज्यात भाजपा मैदानात उतरली आहे.

Exit mobile version