रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगावरील शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. पुतीन यांच्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान रशिया देशाचे कारभाराची सूत्रं रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पॅत्रुशेव्ह यांच्याकडे असणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची तात्पुरता कार्यभारही त्यांच्याकडेच राहणार आहे.
पुतिन यांच्यावर कोलन कॅन्सरची शस्त्रक्रिया होणार आहे. पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या पुतिन यांना पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सन्सचा आजार आहे. त्यांचे ९ मे नंतर कॅन्सरचे ऑपरेशन होणार आहे. पुतीन यांना गेल्या १८ वर्षांपासून पोटाच्या कर्करोगाने आणि कंपवाताचा त्रास आहे त्यासाठी ते आपले खास सहयोगी आणि कट्टर गुप्तहेर प्रमुख निकोलाय पॅत्रुशेव्ह यांच्याकडे सत्ता सोपवणार आहेत.
पेत्रुशेव्ह हे पुतीन यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. युक्रेनवरील हल्ल्याच्या रणनीतीचे ते प्रमुख शिल्पकार मानले जातात. पुतीन यांच्यावरील कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा दावा प्रसिद्ध टेलिग्राम वाहिनी ‘जनरल एसव्हीआर’ने केला आहे.
हे ही वाचा:
‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’
मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये
राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल
चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा
९ मे रोजी रशियामध्ये दुसऱ्या जागतिक युद्धातील रशियाने मिळविलेल्या विजयाचा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत. त्यामुळे ९ मे नंतर पुतीन यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आधी ही शस्त्रक्रिया एप्रिलच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये होणार होती. मात्र, यूक्रेन विरोधातील युद्धामुळं ते होऊ शकलेले नाही. आता पुतीन यांच्यावर दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी तारीख निश्चित करण्यात येत आहे.