‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा:
उल्हास नदीला पूर, ठाणे जिल्हा जलमय होण्याची भिती
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?
शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’
मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक दुर्घटना होताना दिसत आहेत. या कोणत्याही दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हे घराबाहेर पडताना दिसले नाहीत. पण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुसळधार पावसात स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या ‘सिलेक्टिव्ह’ बाहेर पडण्यावर लोकांनी आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला आहे.
जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही. https://t.co/OpzeNrvjym
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 19, 2021
दरम्यान वारकऱ्यांना आषाढीच्या वारीला जायला ठाकरे सरकारने मनाई केली आहे. अशावेळी स्वतः मुख्यमंत्री मात्र सहकुटुंब गाडीने विठ्ठलाच्या दर्शनाला जात असल्यामुळे वारकऱ्यांनाही राग व्यक्त केला आहे. भाजपाने या प्रकाराला मुख्यमंत्र्यांचे फोटोमध्ये येण्यासाठी प्रयत्न म्हणून संबोधले आहे.