भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना आज, २५ एप्रिल रोजी अटक केली आहे. त्याच बरोबर तीन माजी नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अटकेनंतर त्यांना लगेचच जामीन मिळाला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवार, २३ एप्रिल रोजी खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला झाला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण खार पोलिसांकडे वर्ग केले होते. त्यानंतर सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा:
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन
कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर
शनिवारी रात्री भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. काच फुटल्यामुळे किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजपाच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली.