‘विहिंप’ने नुपूर शर्माला दिले समर्थन

‘विहिंप’ने नुपूर शर्माला दिले समर्थन

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना वादग्रस्त विधान केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकरणात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी नूपुर शर्मा यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

‘नूपुर यांचे विधान कायदेशीर की, बेकायदा आहे, हा गुन्हा आहे की नाही, हे न्यायालयच ठरवू शकते. पण, न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याआधीच देशभर हिंसाचार केला जात आहे, असे मत आलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे.

एका वाहिनीवर चर्चेदरम्यान पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. त्यावरून देशात कानपूर तसेच अन्यत्रही हिंसक घटना झाल्या होत्या. तसेच आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपाने नूपुर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई तसेच, ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली असून २२ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘शिवसेनेची बी टीम कोणती हे स्पष्ट’

ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

लेडी सचिन तेंडूलकरची क्रिकेटमधून निवृत्ती!

बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी त्यांचे मत स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, धार्मिक एकजूटीत भाजपा विश्वास ठेवते. भाजपा कोणत्याही धर्माच्या पूजनीय, वंदनीय प्रतिकांचा अपमान कधीही स्वीकारू शकत नाही. कोणत्याही धर्म आणि संप्रदायाच्या भावनांचा अपमान करणे भाजपाला मान्य नाही.

Exit mobile version