काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!

उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उभे राहणार असल्याची माहिती

काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अजूनही तेढ असल्याचं पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीच्या वतीने सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.मात्र, विशाल पाटील हे आपल्या मतावर ठाम असून काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे माहिती आहे. तसेच विशाल पाटील हे लवकरच काँग्रेसच्याच तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद जास्त असूनही शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला असे सांगत विशाल पाटील यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली होती.यानंतर थोड्याच दिवसात महाविकास आघाडीने सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.मविआमधून विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या जागेवर काँग्रेसची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा..

न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!

काँग्रेस नेते आणि समर्थकांकडून ‘नेल्सन-दैनिक भास्कर सर्वेक्षणा’त ‘इंडिया’ गटाचा विजयाचा अंदाज वर्तवणारे बनावट कात्रण व्हायरल!

संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!

इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावर १७ भारतीय!

दरम्यान, पक्षाने आपल्या उमेदवारीबाबत पुनर्रविचार करावा, अशी मागणी विशाल पाटील करत आहेत. अशातच आता ते लवकरच काँग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी आशा अजूनही विशाल पाटील यांना आहे.मात्र, जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील हे अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version