संगीतकार विशाल दादलानीला पुन्हा एकदा मोदी द्वेषाची उबळ आली आहे. गेल्या दोन दिवसांत चांगलाच ट्रोल झाला आहे. गलवान खोऱ्यात चीनने फडकाविलेल्या त्यांच्या राष्ट्रध्वजावरून दादलानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती पण त्याने केलेल्या या ट्विटवरून त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच झोडपून काढले.
गलवानमध्ये चीनने आपला राष्ट्रीय ध्वज फडकाविल्याचा व्हीडिओ शेअर करत दादलानीने पंतप्रधानांवर टीका केली होती. गलवानमध्ये चीनने ध्वज कसा फडकाविला, चीनने भारतावर आक्रमण केले आहे, हे एकदा बोलून दाखवा असे आव्हान दादलानीने आपल्या ट्विटर हँडलवरून दिले. पण त्यावर सोशल मीडियावर त्याला नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.
एकाने म्हटले की विसरू नका हा दादलानी आम आदमी पार्टीचा सदस्य आहे आणि त्याच्या पक्षाने भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर शंका व्यक्त केली होती. एकाने दादलानीला आव्हान दिले की, त्याने आणि त्यांचे पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चिनी सैनिकांशी दोन हात करावे. ज्ञान देणे सोपे असते. एकाने म्हटले आहे की, भारताने प्रथम अंतर्गत शत्रूंचा खात्मा करायला हवा. इतिहास साक्ष आहे की, देशातील शत्रूंनीच नेहमी घात केला आहे.
विशेष म्हणजे टाइम्स नाऊ या वाहिनीने चीनच्या त्या ध्वज फडकाविण्याच्या व्हीडिओची पोलखोल केली आहे. तो ध्वज चीनने भारतातील कोणत्याही बळकाविलेल्या जमिनीवर फडकावलेला नाही तर तो चीनमध्येच फडकाविला आहे, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
हे ही वाचा:
दस्तुरखुद्द भगवान श्रीकृष्ण समाजवादी पक्षाच्या प्रेमात!
कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
सिंधुताई : निराधारांना आधार देणारा वटवृक्ष
चीनच्या या व्हीडिओची चर्चा होऊ लागल्यानंतर भारतीय जवानांनीही गलवानमध्ये तिरंगा फडकाविला. त्याचे देशवासियांनी कौतुक केले. त्याबद्दल मात्र दादलानीचे कोणतेही ट्विट आलेले नाही.