वीरेंद्र सेहवाग हा तडाखेबंद क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या बाहेरही त्याच्या वक्तव्यातून चौकार षटकार बरसतात. आता थेट त्याने गौतम अदानी यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत विरोधकांना सीमापार भिरकावून दिले आहे.
वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे की, गोऱ्या लोकांना भारताची प्रगती बघवत नाही. भारताच्या शेअर मार्केटवर करण्यात आलेला हल्ला हा सुनियोजित कट आहे. पण असे प्रयत्न कितीही केले तर प्रत्येकवेळेस भारत हा प्रखरतेने उजळून निघेल.
सेहवागने २०१५मध्ये आपल्या ३७व्या वाढदिवशी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एक तडाखेबंद सलामीवीर म्हणून त्याची ख्याती होती. कसोटी, वनडे तसेच टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळाची कमाल दाखवून दिली.
Goron se India ki tarakki bardaasht nahi hoti. The hitjob on India’s market looks like a well planned conspiracy. Koshish kitni bhi kar lein but as always, Bharat aur majboot hi nikalkar ubhrega.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 6, 2023
सेहवाग हा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फटकळ आणि परखड बोलण्यामुळे ओळखला जातो. २०१६मध्ये त्याने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर आणलेल्या बंदीची तारीफ केली होती. योग्य पाऊल मोदी सरकारने उचलल्याचे त्याने म्हटले होते.
हे ही वाचा:
कुठला शिवसंवाद हा तर स्वसंवाद!
भूकंपग्रस्त तूर्कीला मदत करण्यासाठी भारत धावला
वंदे भारतने कसारा घाटात इंजिनाला दाखवला कात्रजचा घाट
स्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर
सध्या गौतम अदानी यांच्या उद्योगसमुहाचे शेअर्स प्रचंड घसरले आहेत. अमेरिकास्थित हिंडेनबर्ग कंपनीने अदानी उद्योगसमुहात घोळ असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामुळे अदानी उद्योगसमुहाला त्याची झळ पोहोचली. त्यावरून आता भारतातील विरोधक हे या प्रकरणाची संसदेत चर्चा व्हायला हवी अशी मागणी करत आहेत.
दरम्यान, अदानी उद्योगसमुहाने आपल्या ४१३ पानी अहवालात हे सगळे आरोप खोडून काढले असून असा अहवाल तयार करण्यामागे एक षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
नॅथन अँडरसन यांच्या हिंडेनबर्ग कंपनीने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर भारतातील रिझर्व्ह बँक तसेच सेबीने यासंदर्भात आपण लक्ष ठेवून आहोत आणि गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार आम्ही करू असे आश्वासन दिले आहे.