हिंसक आंदोलकांकडून भाजपा आमदाराला मारहाण

हिंसक आंदोलकांकडून भाजपा आमदाराला मारहाण

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरुच आहे. ४ महिने उलटूनही सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्याने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी दिसत आहेत. शनिवारी (२७ मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासलं.

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र, ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?

पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी

पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी

भाजपा आमदाराच्या अंगावर शाई फेकल्यानंतर पोलीस आणि भाजपा कार्यकर्ता त्यांना एका दुकानात घेऊन गेले. मात्र, नंतर आमदार नारंग दुकानाबाहेर आल्यावर शेतकऱ्यांनी कथितपणे त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी या आमदाराचे कपडेही फाडले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यात पोलीस नारंग यांचा शेतकऱ्यांपासून चबाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत शेतकरी आमदाराला शिव्या देताना आणि मारहाण करतानाही दिसत आहेत. याशिवाय या संतप्त शेतकऱ्यांनी भाजप कार्यालयातील भाजपाचे झेंडही जाळले.

गेले अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने दिल्लीमध्ये २६ जानेवारीलाही हिंसक वळण घेतले होते. आता पंजाबमध्येही आमदाराला मारण्यातून हिंसाचार पाहायला मिळत आहे.

Exit mobile version