ममतांमुळे रवींद्रनाथांच्या ‘शांतिनिकेतनात’ अशांती

ममतांमुळे रवींद्रनाथांच्या ‘शांतिनिकेतनात’ अशांती

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. तिथे विजेते ठरलेल्या तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि कार्यालयांवर हल्ला करायला सुरूवात केली आहे. त्याविरोधात भाजपाने देशव्यापी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. आसाममधील मंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांच्यामुळे शांतता आणि बंधुता शिकविणाऱ्या रवींद्रनाथांच्या भूमीत अशांतता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

बंगालमध्ये निवडणुक जिंकल्यानंतर तृणमुलच्या गुंडांनी हिंसाचाराचे सत्र आरंभले आहे. आत्तापर्यंत यात किमान चार लोकांचा मृत्यु झाला आहे. या मोकाट गुंडांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण, खून, तोडफोड असे प्रकार सर्रास आरंभले आहेत. भाजपाने यावरून तिव्र निषेध व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

बंगालची आजची परिस्थिती फाळणीच्या वेळी होती तशी

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

आसाममधील मंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी देखील आपल्या ट्वीटरवरून ममता दिदींच्या सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी देखील बंगालमधील हिंसाचारावरून टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात,

एकेकाळी देशाला शांतता आणि बंधुता शिकवणाऱ्या रविंद्रनाथ टागोरांच्या बंगाली भूमीच्या नशिबाने अत्यंत वेदनादायी वळण घेतले आहे. आज ममता बॅनर्जींमधील जुलमी शासकाने रक्ताळलेल्या हाताने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

बंगालमधील हिंसाचारावरून भाजपाने टीकेची झोड उठवली आहे. भाजपासोबत बंगालमधील हिंसाचाराबाबत अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्वीट केले होते. परंतु ट्वीटरने कायमचा दुटप्पीपणा दाखवत हे ट्वीट त्यांच्या तथाकथित नियमांत बसत नसल्याचे सांगून, तिचे अकाऊंट बंद केले आहे.

Exit mobile version