27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणदेशातील हिंसाचारात ८० टक्क्यांनी घट

देशातील हिंसाचारात ८० टक्क्यांनी घट

Google News Follow

Related

मोदी सरकारपूर्वी काश्मीर, ईशान्य आणि माओवादी भागात देशाला अंतर्गत सुरक्षा आव्हानांना सामोरे जावे लागले होते. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्येतील माओवादी भागात देशातील हिंसाचारात ८० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. शनिवारी नागपुरात एका मराठी वृत्तपत्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहा बोलत होते. अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

गृहमंत्र्यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले. त्यांनी शनिवारी सकाळी ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना आदरांजली वाहिली आणि नंतर नागपुरातील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देऊन डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहिली.

गृहमंत्री शाह म्हणाले, एका वर्षात काश्मीर खोऱ्यात सुमारे १.८ कोटी पर्यटक आले, ही मोठी गोष्ट आहे. काश्मीरमध्ये ७० वर्षांत केवळ १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, मात्र मोदी सरकारच्या काळात केवळ ३ वर्षांत १२ हजार कोटी रुपये मिळाले. काश्मीरमधील प्रत्येक घरात नळाचे पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे, हा एक मोठा बदल आहे.

ईशान्येकडील दहशतवादात लक्षणीय घट झाली आहे आणि वादग्रस्त सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा ईशान्येच्या सुमारे साठ टक्के भागातून काढून टाकण्यात आला आहे. भारताला जगात अव्वल स्थानी नेण्याचा पंतप्रधान मोदींचा दृष्टिकोन आहे. भारत ७० टक्के स्वयंपूर्णतेसह संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होत असून मोदींच्या नेतृत्वाखाली देश जगाचे उत्पादन केंद्र बनत आहे असेही शहा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

 २५ वर्षांत भारत सर्व क्षेत्रात अव्वल 
‘अमृतकाल’चे तीन प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान सध्याच्या पिढीसमोर आणणे हे पहिले उद्दिष्ट आहे. दुसरे उद्दिष्ट गेल्या ७५ वर्षात देशाने केलेली प्रगती लोकांसमोर आणणे, तर तिसरे उद्दिष्ट पुढील २५ वर्षांत भारत सर्व क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचेल हे सुनिश्चित करणे आहे असे सांगून शाह यांनी सरकार असे निर्णय घेत आहे जे लोकांसाठी फायदेशीर आहेत आणि भारत दोन ते तीन वर्षांत हायड्रोजन उत्पादनात जगात आघाडीवर असेल. त्याचप्रमाणे उपग्रहांच्या क्षेत्रात भारत चार ते पाच वर्षांत खूप पुढे जाईल असे स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा