पश्चिम बंगालमध्ये आज, १३ सप्टेंबर रोजी भाजपाच्या मोर्चामध्ये जोरदार गदारोळ झाला. भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मोर्चाचे आयोजक विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
भाजपाकडून आज सकाळी कोलकातामधील सचिवालयावर ‘नबन्ना अभिजन मोर्चा’ काढण्यात आला होता. यावेळी भाजपाचे राज्यातील कार्यकर्ते मोर्चासाठी कोलकाता आणि हावडा मध्ये दाखल झाले होते. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील कथित भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका भाजपाकडून घेण्यात आली होती.
पोलिसांनी हावडा येथील सचिवालयाकडे जाणारे रस्ते बंद केले होते. पोलिसांनी कोलकाताकडे जाणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बसेस उत्तर २४ परगणा जिल्ह्यात थांबवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बोटीतून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना त्रिवेणी नदीवरच अडवलं. तसेच पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांना अलीपूरमधून ताब्यात घेतलं.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ
महाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढला आहे. सुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी होते. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाचे प्रमुख नेते बनले आहेत.